संपर्क अभियान - 20 ऑक्टोबर ते 20 नोव्हेंबर 2025

 





सर्व बंधू आणि भगिनी यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

दिनांक 20 ऑक्टोबर 2025 ते 20 नोव्हेंबर 2025 ह्या महिन्यात आद्य क्रांतीवीर लहुजी साळवे यांची जयंती उत्सव साजरा होणार आहे. या कालावधीत दीपावली पासून प्रत्येक समाजाच्या घरी संपर्क अभियान राबविण्यात येत आहे. ही सर्व समाज बांधवांची जबाबदारी आहे.
लवकरच भारतीय जनगणना नोव्हेंबर महिन्यात सुरू होणार आहे या उद्देशाने समाजाला योग्य दिशेने घेऊन जाण्यासाठी प्रत्येकाने स्वयं स्पूर्तीने सहभागी व्हावे.
1)जनगणना करताना आपली जात (मांग/मातंग) ,धर्म(हिंदू), शिक्षण ,वास्तव्य , या बाबत माहिती वाचून नंतरच फॉर्म वर सही करावी.
2)आरक्षण वर्गीकरण बाबत जनजागृती करावी.
3)शिक्षण, रोजगार, व्यवसाय, प्रबोधन आणि मार्गदर्शन या बाबत सखोल चर्चा करावी.
4)घरातील कुटुंबाची आस्थेने चौकशी करून त्यांच्या अडचणी समजून घेणे.
5) आर्टीच्या वतीने राबविण्यात येणारे उपक्रमाबाबत चर्चा करावी.
6)सरकारी कामासाठी लागणाऱ्या कागद पत्रा बाबत चर्चा करावी. विशेषतः जात प्रमाण पत्र कसे मिळवावे या बाबत चर्चा करावी.
7)गावातील उद्भवणाऱ्या समस्या बाबत चर्चा करावी. उदा. स्मशान भूमी प्रश्न.
8)शिक्षणाचे प्रमाण वाढविण्यासाठी जी मुले शाळेत जात नाहीत त्यांना शाळेकडे वळविण्यासाठी मार्गदर्शन करणे.
9) जी बेरोजगार मुली मुले बेरोजगार आहेत त्यांना व्यवसायाभिमुख प्रशिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करणे. उदा. तंत्र शिक्षण, कौशल्य प्रशिक्षण.
10)18 वी,12वी ,पदवीधर,विशेष प्राविण्य मिळविलेल्या मुलांची माहिती संग्रहित करणे.
लिंक वर क्लिक करून माहिती भरावी.
11) व्यसन मुक्ती साठी आग्रह धरणे सकारात्मक चर्चा घडून आणावी..
आपले जीवन प्रकाशमान होण्यासाठी दुसऱ्याच्या जीवनात अंधार पडला असेल तर तो दूर करण्यासाठी निःस्वार्थ पने कार्य करा तरच या संपर्क अभियानचे फलित होईल.
धन्यवाद.
जय लहुजी.
ॲड. विक्रम गायकवाड
9820242442

मातंग समाज संघ -संपर्क अभियान छ संभाजी नगर २० ऑक्टोबर

 








जय लहुजी
मातंग समाज संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा.ॲड.विक्रम गायकवाड साहेब यांच्या आदेशानुसार दि.20आक्टोबर ते 20 नोव्हेंबर 2025 या दरम्यान कुटुंब संपर्क अभियान आयोजित करण्यात आलेले आहे.याअंतर्गत, मातंग समाज संघ महाराष्ट्र राज्य,छ.संभाजीनगर यांच्या वतीने गोपाळपूर, अण्णाभाऊ साठे नगर,छ.संभाजीनगर या वस्तीला भेट देऊन जन जागृती व मार्गदर्शन करण्यात आलेले आहे.प्रसंगी समाजाच्या अडीअडचणी जाणून घेतल्या व जनगणना नोंदणी बाबत जागृती केली.मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात कसे ठेवता येईल व ते शिक्षणात कसे पुढे जातील याबाबत प्रबोधन केले. व मातंग समाज संघ सतत आपल्या पाठीशी राहील ही ग्वाही दिली.यानिमीत्ताने या वस्तीतील बांधवांची दिवाळी गोड कशी होईल ही बांधीलकी लक्षात घेऊन मातंग समाज संघ महाराष्ट्र राज्य,छ.संभाजीनगर यांच्या वतीने मिठाई व फराळ वाटप करण्यात आले.सदर अभियान यशस्वी करतांना मातंग समाज संघ महाराष्ट्र राज्याचे सरचीटनीस मा.राजू पवार, उपाध्यक्ष श्री.भाऊसाहेब साठे,छ.संभाजीनगर चे जिल्हा अध्यक्ष श्री.अशोक नाडे व जिल्हा कार्यवाहक श्री.अनिल दाभाडे हे सहभागी झाले.मा.राजू पवार यांनी समाज जागृती करतांना मार्गदर्शन केले व पंचसुत्री बाबत प्रबोधन केले.शेवटी श्री.भाऊसाहेब साठे यांनी आभार मानून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. विशेष भेट सुभाष निकाळजे, सुनिल अहिरे,अरुण कारके,सकुबाई गवळी, शांताबाई अहिरे,मिनाबाई निकाळजे व इतर परिवार सहभागी झालेले आहेत . गोपाळपूर, अण्णाभाऊ साठे नगर छ.संभाजीनगर
जय लहुजी

शिक्षण हा परिवर्तनाचा एकच उपाय आहे



शिक्षण हा परिवर्तनाचा एकच उपाय आहे.

आपल्या मुलांना शाळा शिकवा.

धर्मवीर आनंद दिघे साहेब ऑटो रिक्षा योजना


धर्मवीर आनंद दिघे साहेब ऑटो रिक्षा योजना समाज प्रत्येक ऑटो रिक्षा  यांच्यासाठी जनहितार्थ प्रसारित 
[तारीख १८/८/२०२५]



 

मातंग समाज स्मशान भूमी [ 15 ऑगस्ट 2025 रोजी ग्राम]



 स्मशानभूमी लढा

 (15 ऑगस्ट 2025 रोजी ग्राम सभेत हा विषय प्रत्येक गावाने 

लिखित स्वरूपात देण्यात यावा.)*


                         दिनांक 15 /8/25                                             ग्रामसभा


प्रति,

सरपंच साहेब

ग्रामसेवक साहेब,

ग्रामपंचायत कार्यालय

पूर्ण पत्ता........

गाव...........

ता...........

जिल्हा............


विषय - मातंग समाज स्मशान भूमी आरक्षित करून प्राथमिक सुविधा पुरविण्याबाबत.

महोदय,

वरील विषयी आम्ही गावातील रहिवाशी आज दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी आयोजित ग्राम सभेत प्रस्ताव सादर करीत आहोत की मातंग समाजा साठी असलेल्या स्मशान  भूमीत अत्यावश्यक सेवा पुरविण्यात याव्यात.

तसेच सार्वजनिक स्मशान भूमी आरक्षित करून द्यावी.

तसेच अतिक्रमण रोखण्यासाठी  स्वतंत्र कुंपण घालून देण्यात यावे.

आपले विश्वासू,

समस्त

मातंग समाज बंधू भगिनी

सही

1

2

3

4

5

प्रत

पंचायत समिती कार्यालय.

जिल्हा परिषद अधिकारी

तहसीलदार

जिल्हा अधिकारी

मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य

महसूलमंत्री महाराष्ट्र राज्य

समाजकल्याण मंत्री महाराष्ट्र


टीप - सदर पत्र ग्रामपंचायत कार्यालयास देऊन त्याची पोच घ्यावी.

तसेच  पोच अर्जाची सत्यप्रत 

संबंधित कार्यालयास पोस्टाने (रजिस्टर AD करून ) पुरावा जवळ ठेवावा

धर्मवीर आनंद दिघे ऑटो कल्याणकारी मंडळ योजनेचा फायदा घ्या.


 


जय लहुजी

आपण रिक्षा चालक / मालक आहात  का ? 

तर धर्मवीर आनंद दिघे ऑटो कल्याणकारी मंडळ योजनेचा फायदा घ्या.

खालील लिंक वर जाऊन माहिती भरा

आणि विविध योजनाचा फायदा घ्या. https://ananddighekalyankarimandal.org/home/register

धन्यवाद.

शिक्षित समाज सदृढ समाज

मातंग समाज संघ महा.राज्य


साहित्य रत्न लोकशाहीर डॉ.अण्णा भाऊ साठे १०५ व्या जयंती सुमन नगर चेंबूर मुंबई









 दिनांक १ ऑगस्ट २०२५ रोजी साहित्य रत्न  लोकशाहीर डॉ अण्णा भाऊ साठे १०५ व्या जयंती सुमन नगर चेंबूर मुंबई येथे शैक्षणीक मार्गदर्शन करण्यात आले.

शिक्षित समाज सदृढ समाज घडवण्यासाठी शिक्षणाचा जागर हा उपक्रम सुरू करत आहोत.

मातंग समाज संघ महा.राज्य



साहित्य रत्न लोकशाहीर डॉ अण्णा भाऊ साठे यांनी लिहलेला प्रसिद्ध महाराष्ट्र पोवाडा सचित्र ए आय चित्रफीत











 जय लहूजी

 घराघरात साहित्य रत्न लोकशाहीर डॉ अण्णा भाऊ साठे हे घरोघरी पोचले पाहिजेत या साठी साहित्य रत्न लोकशाहीर डॉ अण्णा भाऊ साठे यांनी लिहलेला  प्रसिद्ध महाराष्ट्र पोवाडा  सचित्र  ए आय चित्रफीत 

साहित्य रत्न लोकशाहीर डॉ अण्णा भाऊ साठे सचित्र ए आय चित्रफीत







                                    जय लहूजी 

 साहित्य रत्न लोकशाहीर डॉ अण्णा भाऊ साठे सचित्र  ए आय चित्रफीत 

 

!!लहू वंदना !!






!! लहू वंदना  !!


जय लहुजी 

आद्य क्रांतिवीर लहुजी साळवे यांची वंदना मुळे  देशाभिमान आणि चैतन्य निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही 

शाहीर बापू पवार यांनी लिहलेले आणि आपल्या मधुर आवाजात हे वंदन गीत घराघरात पोहचले पाहीजे