मातंग समाज संघ -संपर्क अभियान छ संभाजी नगर २० ऑक्टोबर

 








जय लहुजी
मातंग समाज संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा.ॲड.विक्रम गायकवाड साहेब यांच्या आदेशानुसार दि.20आक्टोबर ते 20 नोव्हेंबर 2025 या दरम्यान कुटुंब संपर्क अभियान आयोजित करण्यात आलेले आहे.याअंतर्गत, मातंग समाज संघ महाराष्ट्र राज्य,छ.संभाजीनगर यांच्या वतीने गोपाळपूर, अण्णाभाऊ साठे नगर,छ.संभाजीनगर या वस्तीला भेट देऊन जन जागृती व मार्गदर्शन करण्यात आलेले आहे.प्रसंगी समाजाच्या अडीअडचणी जाणून घेतल्या व जनगणना नोंदणी बाबत जागृती केली.मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात कसे ठेवता येईल व ते शिक्षणात कसे पुढे जातील याबाबत प्रबोधन केले. व मातंग समाज संघ सतत आपल्या पाठीशी राहील ही ग्वाही दिली.यानिमीत्ताने या वस्तीतील बांधवांची दिवाळी गोड कशी होईल ही बांधीलकी लक्षात घेऊन मातंग समाज संघ महाराष्ट्र राज्य,छ.संभाजीनगर यांच्या वतीने मिठाई व फराळ वाटप करण्यात आले.सदर अभियान यशस्वी करतांना मातंग समाज संघ महाराष्ट्र राज्याचे सरचीटनीस मा.राजू पवार, उपाध्यक्ष श्री.भाऊसाहेब साठे,छ.संभाजीनगर चे जिल्हा अध्यक्ष श्री.अशोक नाडे व जिल्हा कार्यवाहक श्री.अनिल दाभाडे हे सहभागी झाले.मा.राजू पवार यांनी समाज जागृती करतांना मार्गदर्शन केले व पंचसुत्री बाबत प्रबोधन केले.शेवटी श्री.भाऊसाहेब साठे यांनी आभार मानून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. विशेष भेट सुभाष निकाळजे, सुनिल अहिरे,अरुण कारके,सकुबाई गवळी, शांताबाई अहिरे,मिनाबाई निकाळजे व इतर परिवार सहभागी झालेले आहेत . गोपाळपूर, अण्णाभाऊ साठे नगर छ.संभाजीनगर
जय लहुजी

No comments:

Post a Comment