आद्य क्रांतिवीर लहुजी साळवे यांच्या 231 व्या जयंती निमित्ताने शिक्षणाचा जागर स्टॉल चे आयोजन संगमवाडी पुणे
जय लहुजीआद्य क्रांतिवीर लहुजी साळवे यांच्या 231 व्या जयंती निमित्ताने संगमवाडी पुणे येथे 14 नोव्हेंबर 2025 रोजी शिक्षण,रोजगार,व्यवसाय,प्रबोधनआणि मार्गदर्शन या पंच सूत्रीला अनुसरून शिक्षणाचा जागर स्टॉल चे आयोजन करण्यात आले होते.स्टॉल वर अनेक बांधवांनी भेट देऊन शैक्षणिक मार्गदर्शनाचा लाभ घेतला. ह्या प्रसंगी विधानपरिषद सदस्य आमदार श्री अमित जी गोरखे साहेब आणि आर्टी च्या निबंधक सन्माननीय सौ.इंदिरा जी अस्वार मॅडम यांनी स्टॉल भेट दिली.हा कार्यक्रमास संस्थापक अध्यक्ष ॲड.विक्रम गायकवाड सर,महाराष्ट्र सरचिटणीस सौ. निता ताई खुडे, महाराष्ट्र संघटक श्री योगेश बोराडे ,मुंबई प्रदेश समन्वयक श्री नामदेव जाधव साहेब,महाराष्ट्र मीडिया प्रमुख श्री गौरव जाधव आणि पुणे जिल्हा पदाधिकारी श्री विक्रम गवळी हे उपस्थित होते.शिक्षित समाज,सदृढ समाज घडविण्यासाठी आम्ही सदैव तत्पर तयार आहोत.मातंग समाज संघ महा.राज्य
No comments:
Post a Comment