सोलापूर (प्रतिनिधी ) मातंग समाज संघ महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्हा वतीने डॉ निर्मलकुमार फडकुले सभागृहात विद्यार्थी पालक मेळावा आयोजित करण्यात आला. प्रथमता छत्रपती शिवाजी महाराज, वस्ताद लहुजी साळवे, छत्रपती शाहु महाराज, महात्मा फुले,डॉ बाबासाहेब आंबेडकर,डॉ साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन मातंग समाज संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष ॲड विक्रम गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले व लहुवंदना घेण्यात आली यावेळी कार्याध्यक्ष संजय भोंडवे, मुख्यसंघटक योगेश बोराडे , सरचिटणीस, निताताई खुडे , महाराष्ट उपाध्यक्ष मीनाक्षीताई पेठे, यांची प्रमुख उपस्थिती होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष आदर्श भैय्या धडे कार्यवाहक श्रीकांत बोराडे, समन्वयक गिरीधर थोरात, जिल्हाअध्यक्ष करुणा झुंजारे, उपाध्यक्ष अवधूत आडकर , चिटणीस किशोर जाधव, शहर अध्यक्ष अनिल उकरंडे , उपाध्यक्ष शशिकांत उकरंडे तसेच या कार्यक्रमाला सुनील क्षीरसागर व्यवस्थापक, राजशेखर शिंदे महाउद्योग अधिकारी, युवराज मोरे MSEB अधिकारी, शेखर वाघमारे अनअकॅडमी, अल्ताफ शेख खादी ग्रामोद्योग, यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले, यावेळी सोलापूर जिल्हातून मातंग समाज संघ महाराष्ट्र राज्य संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिनाक्षीताई पेठे यांनी केले तर आभार आदर्श भैय्या धडे यांनी मानले.
दिनांक 5 मे 2025 रोजी मातंग समाज संघ महा.राज्य जिल्हा सोलापूर येथे आयोजित
विद्यार्थी पालक मेळाव्याची सुरुवात लहू वंदनेने करण्यात आली
शिक्षित समाज,सदृढ समाज
सोलापूर जिल्हा वतीने डॉ निर्मलकुमार फडकुले सभागृहात विद्यार्थी पालक मेळावा आयोजित करण्यात आला.
news 6/5 /2025
शिक्षित समाज,सदृढ समाज
मातंग समाज संघ महा.राज्य
![]() |
दिनांक 21/1/25 रोजी शासकीय विश्रामगृह,बोरी कक्ष सोलापूर येथे मातंग समाज संघ महाराष्ट्र राज्य पदाधिकारी यांची बैठक झाली मा. ॲड.विक्रम गायकवाड सर यांचे मार्गदर्शनाखाली बैठकीमध्ये मा. मीनाक्षी पेठे मॅडम उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष उपाध्यक्ष रविकांत साठे सुभाष दत्तात्रय उकरांडे रमेश बोराडे युवराज पवार राजू पवार श्रीकांत बोराडे सौ संगीता जाधव शंकर जाधव पत्रकार अनिल झुंजारे भारत गायकवाड गिरिधर थोरात किशोर जाधव ईश्वर हटकर एडवोकेट शैलेश पोटफोडे हजर होते
सोलापूर कार्यकारणी बैठक आयोजित केली होती या बैठकीत संस्थापक सन्माननीय अध्यक्ष ॲड.विक्रम गायकवाड सर यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी मातंग समाज संघाची स्थापना का केली ? या बाबत सखोल माहिती सोबतच समाजाची शैक्षणिक सद्य स्थिती वर भाष्य केले तसेच राज्य उपाध्यक्ष सन्माननीय मीनाक्षी पेठे मॅडम यांनी प्रस्तावित करून संघटने बाबत विस्तृत माहिती दिली. संघटनेचे राज्य सरचिटणीस ना.राजू पवार सर यांनी संघटनेच्या ध्येय धोरणा बाबत अनेक उदाहरणे आणि अनुभव कथन केले. संघाचे कार्याध्यक्ष मा.श्री संजय भोंडवे सर यांनी शिक्षण, रोजगार, व्यवसाय, प्रबोधन आणि मार्गदर्शन या पंच सुत्री वर अभ्यास पूर्ण विवेचन करून विद्यार्थी पालक मेळाव्याचे महत्त्व पटवून दिले.
मातंग समाज संघ सोलापूर चे जेष्ठ समन्वयक श्री शशिकांत बोराडे सर ( निवृत खादी ग्रामोद्योग अधिकारी ) यांनी लवकरच विद्यार्थी पालक मेळावा घेण्या बाबत चर्चा केली.
सर्व उपस्थित पदाधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त करून शिक्षित समाज घडविण्यासाठी योगदान देण्याचे निश्चित केले.
शेवटी सौ.मीनाक्षी पेठे मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले.
आर्टीच्या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा- व्यवस्थापकीय संचालक सुनिल वारे
*
जय अण्णा भाऊ
*


*आर्टीच्या प्रशिक्षणाचा तरुणाईंनी लाभ घ्यावा;*
*व्यवस्थापकीय संचालक सुनिल वारे यांचे आवाहन*
मुंबई, ता. १८: मातंग आणि त्यातील तत्सम जातींच्या उन्नतीकरीता विविध कौशल्य विकास प्रशिक्षण, स्पर्धा परीक्षा पुर्व प्रशिक्षण, विविध योजना राबविण्यात येत आहे. त्यासाठी उमेदवारांनी आपल्या आवडीनुसार स्पर्धा परीक्षा, कौशल्य प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करण्याचे आवाहन आर्टीचे व्यवस्थापकीय संचालक सुनिल वारे यांनी तरुणाईला केले आहे.
तरुणांईनी एकाच वेळी मोठ्या प्रमाणात फॉर्म भरण्यास सुरुवात केल्यामुळे गुगल फॉर्म लोड घेऊन हँग होत असल्याच्या अडचणी नागरीकांनी व्यक्त केल्या होत्या. त्यावर तांत्रिक विभागाने गुगल फार्म ऐवजी आर्टीच्या संकेतस्थळावर उमेदवारांना नोंदणीसाठी नवीन फार्म उपलब्ध करुन दिला आहे. त्यावर जावून उमेदवारांनी नोंदणी केल्यानंतर कौशल्य प्रशिक्षणानुसार त्यांच्या अर्जाची छाननी करुन त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. कौशल्य प्रशिक्षण पुर्ण करणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे. जे उमेदवार स्वंयरोजगार करण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांना व्यावसायाकरीता आर्थिक मदतीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यासाठी ऑनलाईन नोंदणी सुरु असल्याची माहिती श्री. वारे दिली.
*चौकट* 1:
*असे आहेत प्रशिक्षण कोर्सेस*
*स्पर्धा परीक्षा:* एमपीएससी, युपीएससी, बॅंक (आयबीपीएस), रेल्वे, जेईई- नीट, युजीसी- नेट/ सेट, पोलीस/ मिलीटरी.
*कौशल्य विकास:* परदेशात नोकरीसाठी लागणारे विविध कौशल्य प्रशिक्षण व परदेशी उच्च शिक्षणाची संधी, शेतीपुरक विविध व्यवसाय प्रशिक्षण, हार्डवेअर व सॉफ्टवेअर, तसेच कम्प्युटर सर्टिफिकेट संदर्भतील विविध कोर्सेसचे कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
*योजना:* पीएच. डी, पोस्ट पीएच. डी संशोधनासाठी अधिछात्रवृत्ती (फेलोशिप)
*चौकट 2:*
*नोंदणी कशी करावी:* इच्छुक उमेदवारांनी https://arti.org.in या आर्टीच्या संकेतस्थळावर करिअर हा पर्याय निवडावा आणि ऑनलाईन नोंदणी करावी. किंवा पुढील लिंकवर क्लिक करुन https://arti.org.in/arti-job उमेदवार अर्ज करु शकतात.
*ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख:* ३१ जानेवारी २०२५-
*स्वप्नील भालेराव, पीआरओ, आर्टी*
*
जय लहुजी 
*




संकलन - मातंग समाज संघ महा. राज्य
"शिक्षित समाज' सदृढ समाज"
आरटीई प्रवेश प्रक्रिया! 2025
![]() |
आरटीई प्रवेश प्रक्रिया!
१ ली ते ८ वी पर्यंत शाळेमध्ये मोफत प्रवेश ; १४ जानेवारी ते २७ जानेवारी पर्यंत अर्ज करण्याची संधी
आवश्यक कागदपत्र -
• विद्यार्थ्याचे आधारकार्ड
• जातीचा दाखला असेल
• वडिलांचे आधार कार्ड
• रहिवासी पुरावा
• उत्पन्नाचा दाखला
अर्ज दाखल करण्यासाठी अधिकृत वेबसाईट -
#RTE #आरटीई #प्रवेश_प्रक्रिया #शिक्षण #FreeEducation #मोफत_शिक्षण |
![]() |
औ.प्र.संस्था छ.संभाजीनगर या संस्थेचे उपसंचालक मा.प्रदीपजी दुर्गे साहेब यांची भेट घेऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. DATE- 10 JAN 2025 |
MBA/MMS ची CET साठीचे रजिस्ट्रेशन LAST DATE 25/1/2025
PROFF VITTHAL JADHAV SIR
[ COORDINATOR ]
MBA करण्याची संधीMBA/MMS ची cet साठीचे रजिस्ट्रेशन सुरू झाले आहे
तरी मातंग समाजातील ग्रॅज्युएट विद्यार्थी विद्यार्थिनींना नम्र विनंती ताबडतोब मला संपर्क करणे .
प्रो .विठ्ठल जाधव
जय लहुजी
विशेष -
BARTI PUNE कडून मातंग समाजातील विद्यार्थ्यांना मोफत निवासी प्रशिक्षण !*
*•मुख्यतः प्रशिक्षण वर्ग :* बँक, रेल्वे, एलआयसी इत्यादी...
*•प्रशिक्षण कालावधी:* ६ महिने*
*₹५००० रक्कम ही पुस्तक संच खरेदी करिता विद्यार्थ्यांना देण्यात येणार*
*•निवडीचे प्रशिक्षण केंद्र :*
आपकृशि बहुद्देशीय प्रशिक्षण व शैक्षणिक संस्था , संभाजी नगर (औरंगाबाद).
*•पात्रता :*
_शिक्षण : १२ वी पास
_मातंग समाजातील विद्यार्थ्यांकरिता फक्त
_विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा
_वय : १८ वर्ष ते ३४ वर्ष
*खालील लिंक वर क्लिक करून विद्यार्थ्यांनी आपली आवश्यक ती शैक्षणीक माहिती फॉर्म मधे सांगितल्या प्रमाणे भरायची आहे;*
*प्रशिक्षण केंद्र निवडतांना ;*
✓आपकृशि बहुद्देशीय प्रशिक्षण व शैक्षणिक संस्था , छ. संभाजी नगर (औरंगाबाद).8888788756
संकलन - मातंग समाज संघ महा.राज्य
"शिक्षित समाज सदृढ समाज "
अग्नीवीर हवाईदल भरती- 2025
अग्नीवीर हवाईदल भरती- 2025
भारतीय हवाई दल अग्निवीर भर्ती 2025 – अग्निवीर वायु सेवन 01/2026 अधिसूचना PDF
वायुसेना अग्निवीर 01/2026 Bharti अधिसूचना: भारतीय वायुसेना ( IAF - भारतीय वायु सेना ) ने अग्निपथ योजनेअंतर्गत “ अग्निवीर वायु सेवन 01/2026″ या पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे . पात्र अविवाहित पुरुष आणि महिला उमेदवारांना त्यांचे अर्ज https://agnipathvayu.cdac.in/ AV/ या वेबसाइटद्वारे ऑनलाइन सबमिट करण्याचे निर्देश दिले आहेत. भारतीय वायुसेना (IAF – भारतीय वायु सेना) भरती मंडळाने डिसेंबर 2024 च्या जाहिरातीत एकूण विविध रिक्त पदांची घोषणा केली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी तपशीलवार जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा. नोंदणीची अंतिम तारीख 27 जानेवारी 2025 आहे . पात्र उमेदवारांसाठी ही निवड चाचणी 22 मार्च 2025 रोजी होणार आहे
इच्छुक उमेदवारांना भारतीय हवाई दल अग्निवीर वायु भारती 2025 चे नवीनतम अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइट Mahasarkar.Co.In चे अनुसरण करण्याचा सल्ला दिला जातो. उमेदवारांची पात्रता, लेखी व तोंडी (व्यक्तिमत्व) चाचणीचे अभ्यासक्रम आणि गुणांचे वितरण आणि IAF संबंधित इतर सर्व आवश्यक माहिती – भारतीय वायु सेना भर्ती फॉर्म येथे अद्यतनित केले आहेत https://mahasarkar.co.in/ indian-airforce-agniveer- bharti/
भारतीय हवाई दल भर्ती 2025
⇒ पदाचे नाव: अग्निपथ योजनेंतर्गत अग्निवीर वायु सेवन ०१/२०२६.
⇒ वेतन/ मानधन: दरमहा रु. 21,000/- ते रु. 28,000/- पर्यंत.
⇒ वयोमर्यादा: 21 वर्षांपर्यंत.
⇒ अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन.
⇒ अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 07 जानेवारी 2025 (AM 11:00).
⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 जानेवारी 2025 (PM 11:59).
⇒ ऑनलाइन परीक्षेच्या तारखा: 22 मार्च 2025 पासून.
शैक्षणिक पात्रता
विज्ञान विषय: गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजीसह 12 वी / इंटरमीडिएट किमान 50% गुणांसह उत्तीर्ण किंवा अभियांत्रिकीमधील डिप्लोमा कोर्स किंवा दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम किमान 50% गुणांसह उत्तीर्ण.
विज्ञान विषयांव्यतिरिक्त: किमान 50% गुणांसह 12 वी / इंटरमिजिएट उत्तीर्ण किंवा दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम किमान 50% गुणांसह उत्तीर्ण.
भारतीय वायुसेना अग्निवीर भारती शारीरिक मानक
PDF पहा.
Age Limit (वयाची अट)
किमान वय: 17.5 वर्षे
कमाल वय: 21 वर्षे
वयोमर्यादा : ०१ जानेवारी २००५ ते १ जुलै २००८ दरम्यान जन्मलेले उमेदवार (दोन्ही तारखांसह) अर्ज करण्यास पात्र आहेत.
निवड प्रक्रिया
टप्पा-I: ऑनलाइन चाचणी
फेज-II: शारीरिक तंदुरुस्ती चाचणी (PFT)
टप्पा-III: वैद्यकीय तपासणी
अनुकूलता चाचण्या I आणि II

शैक्षणिक पात्रता
विज्ञान विषय: गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजीसह 12 वी / इंटरमीडिएट किमान 50% गुणांसह उत्तीर्ण किंवा अभियांत्रिकीमधील डिप्लोमा कोर्स किंवा दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम किमान 50% गुणांसह उत्तीर्ण.
विज्ञान विषयांव्यतिरिक्त: किमान 50% गुणांसह 12 वी / इंटरमिजिएट उत्तीर्ण किंवा दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम किमान 50% गुणांसह उत्तीर्ण.
*****************
समाज हितार्थ -
'शिक्षित समाज सदृढ समाज"
मातंग समाज संघ महा राज्य
समाज हितार्थ -खादी ग्रामउद्योग आयोग नाशिक -[घाणी तेल प्रशिक्षण]
समाज हितार्थ - दिनांक १७/१२/२०२४
जय लहुजी
समाजातील तरुण वर्गासाठी खादी ग्रामउद्योग आयोग नाशिक
येथे विना शुल् [free] घाणी तेल चे प्रशिक्षण देण्यात येत आहे
तरी गरजू आणि इच्छा असलेल्या नि त्वरित संपर्क करावा .
संपर्क क्रमांक -
श्री सोमनाथ गायकवाड
८८३००७२८२
Subscribe to:
Posts (Atom)