![]() |
दिनांक 21/1/25 रोजी शासकीय विश्रामगृह,बोरी कक्ष सोलापूर येथे मातंग समाज संघ महाराष्ट्र राज्य पदाधिकारी यांची बैठक झाली मा. ॲड.विक्रम गायकवाड सर यांचे मार्गदर्शनाखाली बैठकीमध्ये मा. मीनाक्षी पेठे मॅडम उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष उपाध्यक्ष रविकांत साठे सुभाष दत्तात्रय उकरांडे रमेश बोराडे युवराज पवार राजू पवार श्रीकांत बोराडे सौ संगीता जाधव शंकर जाधव पत्रकार अनिल झुंजारे भारत गायकवाड गिरिधर थोरात किशोर जाधव ईश्वर हटकर एडवोकेट शैलेश पोटफोडे हजर होते
सोलापूर कार्यकारणी बैठक आयोजित केली होती या बैठकीत संस्थापक सन्माननीय अध्यक्ष ॲड.विक्रम गायकवाड सर यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी मातंग समाज संघाची स्थापना का केली ? या बाबत सखोल माहिती सोबतच समाजाची शैक्षणिक सद्य स्थिती वर भाष्य केले तसेच राज्य उपाध्यक्ष सन्माननीय मीनाक्षी पेठे मॅडम यांनी प्रस्तावित करून संघटने बाबत विस्तृत माहिती दिली. संघटनेचे राज्य सरचिटणीस ना.राजू पवार सर यांनी संघटनेच्या ध्येय धोरणा बाबत अनेक उदाहरणे आणि अनुभव कथन केले. संघाचे कार्याध्यक्ष मा.श्री संजय भोंडवे सर यांनी शिक्षण, रोजगार, व्यवसाय, प्रबोधन आणि मार्गदर्शन या पंच सुत्री वर अभ्यास पूर्ण विवेचन करून विद्यार्थी पालक मेळाव्याचे महत्त्व पटवून दिले.
मातंग समाज संघ सोलापूर चे जेष्ठ समन्वयक श्री शशिकांत बोराडे सर ( निवृत खादी ग्रामोद्योग अधिकारी ) यांनी लवकरच विद्यार्थी पालक मेळावा घेण्या बाबत चर्चा केली.
सर्व उपस्थित पदाधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त करून शिक्षित समाज घडविण्यासाठी योगदान देण्याचे निश्चित केले.
शेवटी सौ.मीनाक्षी पेठे मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले.




जय लहुजी 










Indian Air Force Agniveer Syllabus 2025 & Exam Pattern: भारतीय हवाई दल अग्निवीर भरती अभ्यासक्रम 2025 आणि परीक्षेचा नमुना: Click Here