जिल्हा छ.संभाजीनगर
जय लहुजी
मातंग समाज संघ महाराष्ट्र यांच्या वतीने शिक्षण,रोजगार,व्यवसाय,प्रबोधन,आणि मार्गदर्शन या पंच सुत्रीला अनुसरून शिक्षणाचा जागर हा उपक्रम जून महिन्यात राबविण्यात येत आहे.त्यामुळे आज दिनांक 29 जून 2025 रविवारी मातंग समाज संघ जिल्हा छ.संभाजीनगर यांच्या वतीने श्री.भाऊसाहेब साठे,श्री.अनिल दाभाडे व श्री.अशोक नाडे यांनी गोपाळपूर ता.जि.छ.संभाजीनगर येथील वस्तीवर जाऊन भेट घेतली.या ठिकाणी अवचार, अहिरे,कारके,कांबळे व भालेराव परिवार इत्यादी कुटुंबं वास्तव्यास आहेत.या परिवारांमध्ये दहावी उत्तीर्ण कुणीही नाही.सध्या दहवीला अनिकेत कारके हा असून आठवीत दिव्या आणि पायल काळू अहिरे या दोन बहिणी आहेत.सातवीत सोहम अवचार, सहावीत वनिता कारके,शिवा नितीन अवचार, पाचवीत सुकन्या अवचार,पलक कांबळे चौथीत आनंद कारके, तिसरीत श्रेयश कारके,प्राची अवचार, दिव्या अवचार आणि लखन कांबळे एवढी मुले शिकतात.शिक्षणाचा जागर या कार्यक्रमांतर्गत वस्तीवरील या विद्यार्थ्यांना मातंग समाज संघाच्या वतीने वह्या व पेन वाटप करण्यात आलेले आहेत.जेणेकरुन समाजातील मुलांना शिक्षणाची ओढ राहील व आवड निर्माण होईल.पहिली व दुसरी तील लेकरांना सुद्धा एक एक वही देवून शाबासकीची थाप दिली.सर्व लेकरं व कुटुंबातील सदस्यांना आनंद वाटला ही आमच्यासाठी फार महत्वाची बाब वाटली.त्यांच्यमध्ये शिक्षणाची जाणीव करून दिली याबाबत त्यांनी आपल्या कार्याबद्दल आभार मानले.या कार्यक्रमाला सर्वश्री नितीन अवचार, अरुण कारके, रामदास अहिरे, राहूल भालेराव, विकास अवचार, सतीश भालेराव, अरुण अवचार व अनिल कांबळे तसेच माता व भगिनी सुद्धा उपस्थीत होत्या.श्री.नाडे साहेब यांनी मोलाचे मार्गदर्शन केले
शिक्षित समाज,सदृढ समाज 
जय लहुजी


मातंग समाज संघ महा.
No comments:
Post a Comment