कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग

महाराष्ट्र शासन

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य

सत्यमेव जयते


शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील ऑगस्ट २०२५ सत्रासाठी प्रवेश सूचना

ITI Admission Portal : https://admission.dvet.gov.in

राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेतंर्गत (Craftsman Training Scheme) ऑगस्ट २०२५ सत्रातील प्रवेश हे केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रीया (Centralized Online Admission Process) पध्दतीने करण्यांत येत असून प्रवेशाची सविस्तर माहितीपुस्तिका प्रवेश पध्दती, नियमावली व प्रमाणित कार्यपध्दती दि. १५ मे २०२५ पासून प्रवेश संकेत स्थळावर Download Section मध्ये Pdf स्वरुपात उपलब्ध करुन देण्यात

राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांना प्रवेश प्रक्रीयेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक शासकीय व खाजगी औ.प्र. संस्थांमध्ये दि. १५ मे २०२५ पासुन रोज सकाळी १०.०० ते ११.०० या वेळेत निःशुल्क मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले आहे. सदर सुविधेचा सर्व उमेदवारांनी लाभ घ्यावा. प्रवेश पध्दती, नियमावली, प्रवेश संकेतस्थळाबाबत तांत्रिक व तद्नुषंगिक शंका असल्यास नजिकच्या शासकीय वा खाजगी औ.प्र. संस्थेस संपर्क साधावा अथवा संबंधीत प्रादेशिक कार्यालयाच्या मदत कक्षास प्रवेश संकेतस्थळावर देण्यात आलेल्या दुरध्वनी क्रमांकावर सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत संपर्क साधावा. सदर मदत कक्षास संपर्क साधण्यापूर्वी माहितीपुस्तिका अभ्यासावी.

-: अर्ज करण्याची पध्दत :-

१. राज्यातील सर्व शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्रवेश प्रक्रीयेत सहभागी असून सर्व संस्था हे प्रवेश अर्ज स्विकृती केंद्र असतील. अर्ज स्विकृती

केंद्रात उमेदवार ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे / पडताळणी / स्विकृती आणि निश्चिती करु शकतील २. उमेदवारांनी व पालकांनी माहिती पुस्तिकेत देण्यात आलेली माहिती, प्रवेश पध्दती व नियमांचा अभ्यास करुनच ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर करावा. ३. अर्ज कोणत्याही ऑनलाईन माध्यमातुन भरता येईल. सर्व औ.प्र. संस्थांमध्ये प्रवेश अर्ज व विकल्प भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. ४. प्रवेश अर्जात "Primary Mobile Number (प्राथमिक मोबाईल नंबर ) " नोंदविणे अनिवार्य आहे. एका मोबाईल क्रमांकावर केवळ एकच प्रवेश अर्ज नोंदविता येईल. संपूर्ण प्रवेश प्रक्रीयेबाबत उमेदवारांना वेळोवेळी SMS व्दारे माहिती व OTP (One Time Password) कळविण्यात येईल. सबब, उमेदवारांनी आपला अद्ययावत मोबाईल क्रमांक ऑनलाइन प्रवेश अर्जात "Primary Mobile Number" म्हणून नोंदविणे आवश्यक आहे. तसेच सदर मोबाईल क्रमांक प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बदलता येणार नाही.

५. ऑनलाईन अर्जात प्राथमिक माहिती भरल्यानंतर उमेदवारांचे प्रवेश खाते (Admission Account) त्यांचा नोंदणीक्रमांक (Registration Number) हाच User ID म्हणून तयार होईल.

६. उमेदवाराने त्यांच्या प्रवेश खात्यात प्रवेश (Login) करुन "Admission Activities" या मथळ्याखाली "Application Form" वर क्लिक करुन संपुर्ण प्रवेश अर्ज भरावा. प्रवेश अर्जात सादर केलेली सर्व माहिती योग्य असल्याचे पुनश्चः तपासून घ्यावे व प्रवेश अर्ज शुल्क ऑनलाईन पेमेंट गेटवेच्या माध्यमातुन जमा करावे. ७. प्रवेश अर्ज शुल्क भरल्यावर व प्रवेश अर्ज निश्चित करण्यापूर्वी उमेदवारास प्रवेश अर्जातील माहितीत बदल करता येईल.

८. प्रवेशअर्ज शुल्कः

९.१ राखीव प्रवर्ग (Reserved Category): रु. १०० ९.२ अराखीव प्रवर्ग (Unreserved Category): रु. १५० ९.३ महाराष्ट्र राज्याबाहेरील उमेदवार (Outside Maharashtra State): रु.३०० ९.४ अनिवासी भारतीय उमेदवार (Non Residential Indian): रु.५०० ९. उमेदवाराने संपुर्ण प्रवेश अर्ज व प्रवेश अर्ज शुल्क भरल्यानंतर तात्पुरत्या प्रवेश अर्जाची (Provisional Application Form) छापील प्रत (Print Out) घ्यावी. १०. प्रवेश अर्ज निश्चित करणे (Confirmation):

१०.१. प्रवेश अर्ज निश्चित करण्यासाठी उमेदवाराने प्रवेश अर्जातील माहिती / दाव्यांच्या पृष्ठ्यर्थ आवश्यक मुळ दस्तऐवज / कागदपत्रे, कागदपत्रांच्या छायांकीत प्रतींचा (Photocopy) एक संच व तात्पुरत्या प्रवेश अर्जाची छापील प्रत (Print Out) नजिकच्या औ.प्र. संस्थेत पडताळणीसाठी सादर करावेत. प्रवेशासाठी आवश्यक दस्तऐवज / कागदपत्रांची यादी प्रवेश संकेतस्थळावर Download या मथळ्याखाली तसेच माहिती पुस्तिकेत (प्रपत्र-३) उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

१०.२. अर्ज स्विकृती केंद्रामधील अधिकारी हे उमेदवाराने अर्जात नमुद केलेल्या माहितीची उमेदवाराने सादर केलेल्या मूळ दस्ताऐवजावरुन काळजीपूर्वक तपासणी करतील. आवश्यक असल्यास उमेदवारास त्यांनी भरलेली माहिती सादर केलेल्या दस्तऐवज / कागदपत्रांप्रमाणे दुरुस्त करण्याचे निर्देश देतील. तपासणीनंतर अर्जाचे निश्चितीकरण करुन उमेदवारास "अर्ज निश्चितीकरण पावती" (Application Confirmation Slip) व निश्चित केलेल्या प्रवेश अर्जाची (Confirmed Application Form) प्रत देतील.

१०.३. अर्ज स्विकृती केंद्रामधील अधिकारी अर्ज पडताळणी व प्रवेश अर्ज निश्चित केल्यावर उमेदवारास सर्व मुळ दस्तऐवज / कागदपत्रे परत करतील. १०.४. उमेदवारास प्रवेश अर्ज निश्चित करण्यासाठी औ.प्र. संस्थेस कोणतेही शुल्क देय नाही.

१०.५. प्रवेश अर्ज निश्चित केल्यानंतर औ. प्र. संस्था मुळ दस्तऐवज / कागदपत्रे परत करीत नसल्यास अथवा प्रवेश निश्चित करण्यासाठी शुल्क आकारत असल्यास उमेदवाराने त्वरीत मदत कक्षास संपर्क साधावा.

११. निश्चित केलेल्या प्रवेश अर्जांचाच सर्व प्रवेश फेऱ्यांकरिता विचार करण्यात येईल. निश्चित न केलेले अर्ज प्राप्तच झाले नाहीत असे समजण्यात येईल १२. प्रवेश अर्ज निश्चित केल्यावर उमेदवारास प्रवेश अर्जातिल माहितीत बदल करता येणार नाही. तथापि, उमेदवारास प्रवेश अर्जात सादर केलेल्या काही निवडक माहितीत कोणत्याही प्रकारे बदल करावयाचा असल्यास त्यासाठी प्राथमिक गुणवत्ता फेरी नंतर "हरकती नोंदविणे" या फेरीत आपल्या प्रवेश खात्यात प्रवेश (Login) करुन तसा बदल करता येईल. तद्नंतर प्रवेश अर्जात कोणत्याही प्रकारे बदल करता येणार नाही.

१३. प्रवेश अर्ज निश्चित केल्यावर पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करण्यासाठी प्रवेश संकेतस्थळावर नोंदणी क्रमांक (Registration Number) व पासवर्ड (Password) व्दारे प्रवेश (Login) करुन "Submit / Change Options / Preferences" व्दारे सादर करावेत. १४. पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य पूर्ण भरल्यानंतर Option Form ची छापील प्रत (Print Out) घ्यावी.
१५. उमेदवाराने एकच अर्ज भरावा. एकापेक्षा जास्त अर्ज भरल्यास त्या उमेदवाराचे सर्व अर्ज रद्द होतील. अशा उमेदवाराची निवड झाल्यास वा चूकीने प्रवेश देण्यात आला असल्यास त्याचा प्रवेश रद्द करण्यात येईल व उमेदवार संपूर्ण प्रवेश प्रक्रीयेतून बाद होईल.

१६. अनिवासी भारतीय व इतर राज्यातील रहिवासी असलेल्या उमेदवारांनी देखिल दि. १५ मे २०२५ पासूनच ऑनलाईन प्रवेश अर्ज व चौथ्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करणे आवश्यक आहे.

१७. प्रत्येक प्रवेश फेरीत निवड झालेल्या उमेदवारांना निवडपत्र (Allotment Letter) Online उपलब्ध करुन देण्यात येईल. यासाठी उमेदवारांनी आपल्या Account ला Login करुन निवडपत्राची प्रिंट घेवून निवड झालेल्या औ.प्र. संस्थेत प्रवेशासाठी दिलेल्या वेळापत्रकानुसार उपस्थित रहावे. उमेदवारांना निवडपत्राची (Allotment Letter) छापील प्रत (Print Out) ज्या संस्थेत त्याची निवड झाली त्या संस्थेत देखिल घेता येईल.

१८. उमेदवाराने त्यास बहाल करण्यात आलेल्या जागेवर प्रवेश निश्चित करतांना प्रवेश अर्जातिल दाव्यांच्या पृष्ठ्यर्थ आवश्यक दस्तऐवज / कागदपत्रे संबंधीत संस्थेत तपासणीसाठी सादर करावेत. प्रवेशासाठी आवश्यक दस्तऐवज / कागदपत्रांची यादी प्रवेश संकेतस्थळावर तसेच माहिती पुस्तिकेत (प्रपत्र-३) उपलब्ध करुन देण्यात आली आहे. प्रवेश निश्चितीच्या वेळी आवश्यक दस्तऐवज / कागदपत्रे सादर करु न शकल्यास व/वा माहितीत तफावत आढळल्यास उमेदवारांना बहाल करण्यात आलेली जागा रद्द करण्यात येईल व उमेदवाराला पुढील प्रवेश फेऱ्यांतून बाद करण्यात येईल.

-: प्रवेशाचे वेळापत्रक :-

अ.क्र. १.० ऑनलाईन प्रवेश अर्ज करणे प्रवेश प्रक्रीयेचा तपशील १.१ ऑनलाईन पध्दतीने प्रवेश अर्ज भरणे, अर्जात दुरुस्ती (Edit) करणे व प्रवेश अर्ज शुल्क जमा करणे. २.० प्रवेश अर्ज निश्चित करणे प्रारंभ दिनांक १५ मे २०२५ २.१ अर्ज स्विकृती केंद्रात (राज्यातील शासकीय वा खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत) मूळ कागदपत्रांच्या तपासणीनंतर प्रवेश अर्ज निश्चित १५ मे, २०२५ (Confirmation) करणे २.० पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करणे २.१ | प्रवेश अर्ज शुल्क भरल्यावर पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करण्यासाठी प्रवेश संकेतस्थळावर २६ मे, २०२५ | नोंदणी क्रमांक (Registration No.) व पासवर्ड (Password) व्दारे प्रवेश (Login) करुन सादर करणे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परिक्षा मंडळ यांच्याव्दारे इ. १० वी ची गुणपत्रिका संबंधीत शाळांमार्फत वितरीत करण्यात आल्यावर प्रवेशाचे सविस्तर वेळापत्रक प्रवेश संकेतस्थळावर घोषित करण्यात येईल.

-: महत्वाची सुचना :-

१. उमेदवाराने त्याच्या प्रवेश खात्याचा (Admission Account) पासवर्ड (Password) कोणासही देऊ नये व त्यासंबंधी संपूर्ण गोपनीयता पाळावी. Password विसरल्यास तो Reset करण्याची सुविधा प्रवेश संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

२. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (PPP) अंतर्गत राज्यात असलेल्या २५० औ. प्र. संस्थांमधील सर्व अभ्यासक्रमातील २०% जागा या माहिती पुस्तिकेत दिलेले "विशेष प्रशिक्षण शुल्क" आकारुन गुणवत्तेनुसार भरण्यात येतील. त्या जागांसाठी इच्छुकांना Online प्रवेश प्रक्रीयेत स्वतंत्र विकल्प (Option) देण्याची मुभा राहणार आहे. उदा. Fitter-IMC, Welder-IMC, etc. उमेदवारांनी अशा जागांसाठी विकल्प सादर करण्यापूर्वी माहितीपुस्तिकेत प्रशिक्षण शुल्काबाबत ( मुद्दा क्र. १५.१) माहिती वाचावी.

३. शासकीय औ.प्र. संस्थांमधील पव्लिक प्रायवेट पार्टनशिप (पीपीपी) योजनेंतर्गत प्रवेशासाठी उपलब्ध जागा (IMC Seats) व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील केंद्रीय ऑनलाईन पध्दतीने प्रवेश देण्यात येणाऱ्या जागांवर प्रवेशित प्रशिक्षणार्थ्यांना त्यांच्या प्रवर्गानुसार ८० ते १००% व्यवसाय प्रशिक्षण प्रतिपूर्ती योजना लागू करण्यात आली आहे. व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनेंतर्गत दिले जाणारे लाभ, योजनेसाठी पात्रता व आवश्यक कागदपत्रे या बाबत सविस्तर माहिती माहिती पुस्तिकेत व प्रवेश संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

४. प्रवेश प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर ज्या शासकीय औ. प्र. संस्थांमधील व्यवसायांत एकूण प्रवेश क्षमतेच्या ५०% पेक्षा कमी प्रवेश झाले असतील अशा व्यवसायातील प्रवेशित उमेदवारांना त्याच संस्थेत इतर व्यवसायात किंवा जवळच्या दुसऱ्या शासकीय औ.प्र. संस्थेतील संबंधित व्यवसायात सामावून घेण्यात येईल. (माहिती पुस्तिकेतील मुद्दा क्र. २२.१)

५. राज्यातील सर्व शासकीय व खाजगी औ.प्र. संस्थांतील सर्व प्रकारच्या जागांसाठी प्रवेश हे केंद्रीय ऑनलाईन पध्दतीने होत असून केंद्रीय पध्दतीत उपलब्ध जागा व संस्थास्तरावरील जागांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन प्रवेश प्रणाली व्यतिरिक्त प्रवेश घेणाऱ्या उमेदवारांचे प्रवेश ग्राह्य धरण्यात येणार नाही याची सर्व उमेदवार, पालक व औ.प्र. संस्थांनी नोंद घ्यावी.

६. केद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रीयेत सहभागी खाजगी औ. प्र. संस्था व त्यातील व्यवसाय अभ्यासक्रमांच्या तुकड्या हया कायम विनाअनुदानित तत्वावर शासन मान्यताप्राप्त व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परीषद (NCVT) यांचेशी संलग्न आहेत. या व्यवसाय अभ्यासक्रमांच्या तुकड्यांमधील प्रवेशित व प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवारांची परीक्षा - अखिल भारतीय व्यवसाय प्रमाणपत्र परीक्षा (AITT) ही शासकीय औ. प्र. संस्थांतील उमेदवारांप्रमाणेच घेण्यात येवून उत्तीर्ण उमेदवारांना राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र (NTC) बहाल करण्यात येते. उमेदवारांनी खाजगी औ.प्र. संस्थांमध्ये संस्थास्तरावरील जागांसाठी प्रवेश घेण्याअगोदर, ते ज्या व्यवसाय अभ्यासक्रमाच्या तुकडीत प्रवेश घेत आहेत ती व्यवसाय अभ्यासक्रमाची तुकडी NCVT शी संलग्नीत आहे का ते NCVT-MIS पोर्टल www.ncvtmis.gov.in वर ITI Search या मथळ्या खाली तपासावे. असंलग्नीत व्यवसाय अभ्यासक्रमाच्या तुकडीत प्रवेश घेतलेल्या उमेदवारांची परीक्षा संचालनालयामार्फत घेण्यात येणार नाही.

७. राज्यातील सर्व शासकीय व मान्यता प्राप्त खाजगी औ.प्र. संस्था व या संस्थेतील संलग्न व्यवसाय अभ्यासक्रमांच्या तुकड्यांची यादी https://admission.dvet.gov.inwww.dvet.gov.in तसेच www.ncvtmis.gov.in या संकेतस्थळांवर देखिल उपलब्ध आहे. तरी प्रवेशोच्छुक सर्व उमेदवारांनी सदर संकेतस्थळांना एकवेळ अवश्य भेट दयावी.

८. वरील प्रवेश वेळापत्रक सूचक दर्शक असून त्यात बदल संभवतो. अद्ययावत प्रवेश वेळापत्रक प्रवेश संकेतस्थळावर व सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच नोंदणीकृत उमेदवारांना SMS व्दारे वेळोवेळी कळविण्यात येईल. संपूर्ण प्रवेश प्रक्रिये दरम्यान उमेदवारांनी वेळोवेळी प्रवेश संकेतस्थळास भेट देणे त्यांचे हिताचे राहील.
(सतिश सुर्यवंशी)
संचालक

दिनांक १५ मे २०२५
स्थळ: मुंबई

- संकलन 
मातंग समाज संघ mahs
शिक्षित समाज सदृद्ध समाज












मातंग समाज संघ महा.राज्य शेंद्रा मांगवीरबाबा  यात्रा
छ. संभाजी नगर जिल्हा यांच्या वतीने दिनांक १८ एप्रिल २०२५ रोजी शेंद्रा मांगवीर बाबा  यात्रा निमित्त शिक्षण ,रोजगार ,व्यवसाय ,प्रबोधन आणि मार्गदर्शन या पंच सुत्रीचा अवलंब करून शिक्षणाचा जागर उपक्रम राबविण्यात आला . या उपक्रमात अनेक विद्यार्थी आणि पालक यांनी भाग घेतला ,उपस्थित पालक आणि विद्यार्थी यांना तंत्र शिक्षण ,आय टी  आय बाबत माहिती पत्रक निशुल्क वाटण्यात आली . प्रसंगी ऍड विक्रम गायकवाड सर, संस्थापक  अध्यक्ष ,श्री भाऊसाहेब साठे सर राज्य उपाध्यक्ष , श्री अनिल दाभाडे साहेब कार्यवाहक छ संभाजी नगर ,  ,श्री अशोक नाडे साहेब जिल्हा अध्यक्ष , श्री रामदास साठे साहेब जिल्हा समन्व्यक आणि पदाधिकारी उपस्थित होते 







दिनांक 17 एप्रिल 2025 रोजी वरखेड ता नेवासा जिल्हा अहिल्यानगर येथे लक्ष्मी देवी यात्रा निमित्त शिक्षणाचा जागर हा उपक्रम राबविण्यात आला.

प्रसंगी ॲड.विक्रम गायकवाड संस्थापक अध्यक्ष, कार्याध्यक्ष श्री संजय भोंडवे सर, श्री राजू पवार सर मग.राज्य सरचिटणीस , श्री भाऊसाहेब साठे उपाध्यक्ष महा.राज्य, श्री सुरेश जगधने अहिल्यानगर कार्यवाहक, श्री कैलास उमप अहिल्यानगर समन्वयक , श्री लखन ससाणे पोतराज सेना, श्री कनगरे पोतराज सेना संघटना अध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित होते.



विशेष अभियान
स्मशान लोकशाही समस्या निर्मूलन अभियान
बंधू आणि भगिनी यांना सूचित केले जात आहे की महाराष्ट्रात ग्रामीण भागात स्मशान भूमीचा प्रश्न निर्माण झाला आहे अनेक ठिकाणी प्रेताची विटंबना केली जात आहे.
मुंबई पंचायत अधिनियम १९५८ अंतर्गत ग्रामपंचायतींच्या अंतर्गत स्मशान सुविधाचीता आणि देखरेख तंत्रज्ञान प्रशासनाची आहे.
यातील काही बाबी समजून घेणे आवश्यक आहे.
काही गावात सवर्णाची खाजगी जागेत स्मशान भूमी तयार केली जाते त्यावर ग्राम पंचायतीकडून खर्च सुद्धा केला जातो पण अनुसूचितील जातीतील मातंग समाज हा हिंदू आहे.
ज्यावेळी गावातील मातंग समाजाच्या व्यक्तीचा मृत्यू होतो अश्या वेळेस गावातील अडाणी सवर्ण लोक विरोध करतात अंत्येष्टी करण्यास मज्जाव करतात त्यासाठी ही आडकाठी कायमची दूर करण्यासाठी स्वतंत्र स्मशान भूमीची व्यवस्था करण्यासाठी अभियान राबविण्यात येणार आहे.
कार्य कसे करावे.
१)ज्या गावात स्वतंत्र व्यवस्था नाही त्या गावात येत्या १५ ऑगस्ट २०२५ रोजी ग्राम सभेत मागणी करणे.
२) ग्राम सभेचा ठराव काय झाला याबाबत लिखित माहिती घेणे.
३)सदर ठरावाचा पाठ पुरावा पंचायत समिती/जिल्हा परिषदे कडे करणे.
४)भूमी अभिलेख कार्यालय कडे जागेची मागणी करणे.
५)भूमी अभिलेख अधिक्षक यांना मागणी केलेले पत्र तहसीलदार /जिल्हा अधिकारी यांना देणे.
६)ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी यांच्याशी संबंधित विषयावर वारंवार विचारणा करणे.
७). ७/१२ नोंदी सुनिश्चित करणे. स्मशान भूमी जागांचे सुशोभीकरण करणे अभिलेख अद्ययावत करणे. 
८) जर गावातील राखीव स्मशान भूमीची जागा ७/१२ निश्चित असेल तर भूमी अभिलेख कार्यालय कडून माहिती अधिकारा खाली माहिती गोळा करणे जर ती जागा सार्वजनिक स्मशान भूमी साठी असेल आणि जर कोणी अंत्यविधी करण्यास मज्जाव करीत असेल तर त्यावर रीतसर कायदेशीर कारवाई करण्यास भाग पाडणे.
९)जी ग्राम पंचायत स्मशान भूमीसाठी सहकार्य करणार नाही त्यांची रीतसर पंचायत समिती,केंद्र शासन पंचायत राज कक्ष, राज्याचे मुख्य सचिव, राज्याचे राज्यपाल यांच्या कडे दाद मागून न्याय मिळविणे .
यासाठी महाराष्ट्र राज्यात कृती समिती स्थापन करण्यासाठी लवकरच निर्णय घेण्यात येईल.सर्व संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हे कृती समितीचे पद सिद्ध सदस्य असतील.
हा विषय समाजाच्या अती संवेदनशील आहे त्यामुळे सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे.
काही सूचना असतील तर अवश्य पाठवा.
आपला समाज बांधव
ॲड.विक्रम गायकवाड
9820242442
*मातंग समाजातील विविध संघटनांची यादी*

१)आखिल भारतीय मातंग संघ-स्व.बाबासाहेब गोपले. 
२)बहूजन मजूर पक्ष-दादासाहेब क्षिरसागर. 
३)मानवी हक्क अभियान-प्रा.मिलींद आवाड. 
४)भारतीय लहूजी सेनाव्हि.जी.रेड्डी. 
५)दलित महासंघ-प्रा.मच्छिंद्र सकटे सर. 
६)डि.पी.आय-सुकूमार कांबळे.
७)लहूजी शक्ती सेना-विष्णुभाऊ कसबे 
८)लोकराज्य अंदोलन-प्रा रामचंद्र भराडे सर. 
९)मातंग सेवा संघ-दिलीप मोहीते.
१०) फकिरा ब्रिगेड-डॉ.संजय शिंदे. 
११)लाल फौज-बजरंग ताटे
.१२)लहूजी साळवे बहूजन क्रांती सेना-राधाजी शेळके
.१३)रिपब्लिकन क्रांती सेना-प्रा बाळासाहेब लोखंडे.
१४)मातंग अस्मिता संघर्ष सेना-राजाभाऊ सुर्यवंशी.
१५)आध्यक्रांती गुरू लहूजी साळवे बलशूर-शत्रुघ्न कांबळे.
१६)विदर्भ लहूजी सेना-मेजर खंदारे 
१७)क्रांतीवीर लहूजी शक्ती सेना-शंकरराव तडाखे 
१८)लाल सेना-गणपत भिसे. १९)लहूजी साळवे विकास परिषद-उत्तम कांबळे.
२०) मातंग प्रबोधन परिषद-संजय काशीराम इंचे.
२१)बहूजन रयत परिषद-लक्ष्मण ढोबळे 
२२)ल.सा क.म.-घोडके
२३)ल.सा क .म.डॉ.अर्जुने
२४)भारतीय दलित संसद-अंबादास सकट.
२५)आण्णा भाऊ साठे फौंडेशन-डॉ.डि.बी.भालेराव
.२६)सामाजिक न्याय अंदोलन- पुणे. 
२७)मानवी हक्क सुरक्षा दल-भाई जगदीश इंगळे. 
२८)सत्यशोधक समाज पक्ष-मिलींद गायकवाड.
२९)महाराष्ट्र परिवर्तन सेना-आ.सुधाकर भालेराव.
३०)लहु शक्ती संग्राम-मधुकर कांबळे. 
३१)बीसेफ-एच.पी.कांबळे.
३२)राष्ट्रीय मातंग महासंघ-सत्यनारायण राजहंस.
३३)दलित युवक अंदोलन-सचिन बगाडे.
३४)लहूजी संघर्ष सेना-सुरेश बैलुम.
३५)मातंग एकता अंदोलन-रमेश बागवे.माजी मंत्री महोदय
३६)लहूजी संघर्ष सेना-विकास सातारकर.
३७)आण्णा भाऊ साठे विध्यार्थी मंच-मारूती कसाब.
३८)लहूजी टायगर सेना-शरदभाऊ त्रिभुवन.
३९)इंडियन मातंग ब्रिगेड-डॉ.बालाजी पेनुरकर.
४०)अंबूज बटालियन-मा.वैराळ.राष्ट्रीय 
४१)लहूजी सेवक-दिपक गोहिल
.४२)दलित स्वयंसेवक संघ-रमेश राक्षे.
४३)राष्ट्रीय मातंग शक्ती-रावसाहेब अंतापुरकर.
४४)मातंग पंचायतन संघ-मधुकर कांबळे. 
४५)दलित विकास आघाडी-जयवंतराव आवळे.
४६)मातंग सेवा संघ-दिलीप मोहीते. 
४७)जय लहूजी सामाजिक संस्था-व्यंकटराव शिंदे.
४८)क्रांतीगुरू सोशल फौंडेशन -श्री गोपाळ साठे.
४९)क्रांतीपिता लहूजी वस्ताद साळवे संघटना-शत्रुघ्न आपटे
.५०)अखिल भारतीय आण्णा भाऊ साठे संघर्ष समीती-डॉ पांडूरंग बाळातवाडीकर
.५१)राष्ट्रीय मानव सेवा संघ- चंद्रकांत वानखेडे.
५२)लोकशाहीर आण्णा भाऊ साठे युवा मंच-अंतोन गायकवाड.
५३)महाराष्ट्र लहूजी क्रांती सेना-राधाक्रष्ण साठे. 
५४)आण्णा भाऊ साठे युवक संघटना-दिलीप देवकुळे
.५५)आण्णा भाऊ साठे फौंडेशन-मारूती साठे.
५६)भिम-लहूजी संग्राम सामाजिक विकास संघटना-विनोद वैरागर. 
५७)भारतीय मातंग शक्ती-शंकरराव साठे.
५८)मातंग समाज संघ महाराष्ट्र राज्य -adv.विक्रम गायकवाड.
 ५९)लहूजी प्रतिष्ठाण-गोरख नेटके.
६०)झोपडपट्टी सुरक्षा दल-भगवान वैराट.
६१)मातंग एकता शक्ती-
झोंबाडे.
६२) अंबुज पार्टी ऑफ इंडिया श्री वायदंडे
६३) संजीवनी प्रतिष्ठान मुंबई श्री तुकाराम साठे
६४) लोकमांगल्य प्रतिष्ठान पुणे
६५) आद्य क्रांती गुरू लहुजी साळवे समाज प्रबोधन मंच नागपूर श्री महादेव जाधव
६६) लोकशाहीर अण्णा भाऊ साठे समाज प्रबोधिनी सांगली श्री यशवंत आवळे
६७) फकिरा दल श्री सतीश कसबे
६८) महाराष्ट्र मातंग एकता दल श्री राजकुमार शिंदे
६९) लोकशाहिर अण्णा भाऊ साठे उद्यान बचाव समिती मुंबई श्री वसंत तुपसुंदर
७०) लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृह बचाव समिती भायखळा मुंबई श्री मोहन तुपसुंदर
७१) अखिल भारतीय लहुजी सेना श्री योगेश शिंदे
७२) जय लहुनी युवा प्रतिष्ठान विले पार्ले मुंबई, श्री लहुजी थोरात
७३) जनता क्रांती दल श्री सत्यवान कमाने
७४) बहुजन परिवर्तन पार्टी श्री बाजीराव नाईक कोल्हापूर
७५) लोकशाहीर अण्णा भाऊ साठे प्रतिष्ठान पुणे श्री भाऊसाहेब सोनवणे
७६) लहू शक्ती सेना: संजय शितोळे, ९९२२०५३४०५.
*७७) लहूजी संघर्ष सेना: सुरेश बहिलुम,९८२२६०६५४९.
७८) मातंग सेवा संघ:दिलीप मोहीते, सोलापुर.
७९) सामाजिक न्याय अंदोलन: पुणे.
८०) मानवी हक्क सुरक्षादल:जगदीश इंगळे,बूलढाणा.
८१) महाराष्ट्र परिवर्तन सेना: थोरात मुंबई.
८२) मातंग शक्ती सेना: सुधाकर भालेराव उदगीर.
८३) लहूजी संघर्ष सेना: विकास सातारकर.पुणे.
८४) मातंग ऐकता अंदोलन: रमेश बागवे.पुणे.
८५) बहूजन मजूर पक्ष: दादासाहेब क्षिरसागर, अमरावती.
८६) आसरा फौंडेशन कोल्हापूर श्री देवरथ लोंढे 8788216662
८७) बहुजन जनता पार्टी श्री अशोक आल्हाट नाशिक संपर्क नं. ७७३८०३३३५३
८८)सत्यशोधक समाज महासंघ :-जी.एस.कांबळे.
८९)महाराष्ट्र क्रांती सेना :- राधाक्रष्ण साठे.
९०) All india Mrps :- अजित केसराळीकर.
९१) क्रांतीकारी रिपल्स फोर्स :- मनोज वाघमारे.
९२) राष्ट्रीय समाज महासंघ :- आ.राम गुंडिले.
९३)मातंग समाज आरक्षण समीती :- आ.अविनाश घाटे.
९४) अखिल भारतीय आण्णा भाऊ साठे विकास परिषद :- किसन गायकवाड.
९५) लोकराज्य ह्युमन डेव्हलपमेंट संस्था :- राधिकाताई चिंचोलीकर.
९६) आण्णा भाऊ साठे संघर्ष परिषद :-सतीष कावडे.
९७)आण्णा भाऊ साठे पिपल्स फोर्स :-बा.रा.वाघमारे.
९८) आण्णा भाऊ साठे समाज फौंडेशन :- दिनकर लांडगे कॉ.८३७८९१४७०८.
९९) आण्णा भाऊ साठे साहित्य परिषद:-प्रा.विठ्ठल भंडारे.
१००)आण्णा भाऊ साठे कम्युनिष्ट पार्टी :- प्रा. सदाशिव भुयारे.
१०१) बहूजन क्रांती दल :- बी.एम.गायकवाड.
१०२)मानव हित सामाजिक संघटना :- सचिन साठे.
१०३) मातंग समाज संघर्ष समीती :- आ.हरिष मोरे.
१०४) क्रांती पिता लहूजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ :- तुकाराम खानजोडे.
१०५) महाराष्ट्र युवक परिषद :- ad.त्र्यंबक मोरे.
काही यादीत समाविष्ट नसलेल्या अधिकच्या संघटना संस्थापक अध्यक्ष सामील असतील.

 









दिनांक 5 मे 2025 रोजी मातंग समाज संघ महा.राज्य जिल्हा सोलापूर येथे आयोजित
विद्यार्थी पालक मेळाव्याची सुरुवात लहू वंदनेने करण्यात आली
शिक्षित समाज,सदृढ समाज





सोलापूर जिल्हा वतीने डॉ निर्मलकुमार फडकुले सभागृहात विद्यार्थी पालक मेळावा आयोजित करण्यात आला.
news 6/5 /2025



 सोलापूर (प्रतिनिधी ) मातंग समाज संघ महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्हा वतीने डॉ निर्मलकुमार फडकुले सभागृहात विद्यार्थी पालक मेळावा आयोजित करण्यात आला. प्रथमता छत्रपती शिवाजी महाराज, वस्ताद लहुजी साळवे, छत्रपती शाहु महाराज, महात्मा फुले,डॉ बाबासाहेब आंबेडकर,डॉ साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन मातंग समाज संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष ॲड विक्रम गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले व लहुवंदना घेण्यात आली यावेळी कार्याध्यक्ष संजय भोंडवे, मुख्यसंघटक योगेश बोराडे , सरचिटणीस, निताताई खुडे , महाराष्ट उपाध्यक्ष मीनाक्षीताई पेठे, यांची प्रमुख उपस्थिती होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष आदर्श भैय्या धडे कार्यवाहक श्रीकांत बोराडे, समन्वयक गिरीधर थोरात, जिल्हाअध्यक्ष करुणा झुंजारे, उपाध्यक्ष अवधूत आडकर , चिटणीस किशोर जाधव, शहर अध्यक्ष अनिल उकरंडे , उपाध्यक्ष शशिकांत उकरंडे तसेच या कार्यक्रमाला सुनील क्षीरसागर व्यवस्थापक, राजशेखर शिंदे महाउद्योग अधिकारी, युवराज मोरे MSEB अधिकारी, शेखर वाघमारे अनअकॅडमी, अल्ताफ शेख खादी ग्रामोद्योग, यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले, यावेळी सोलापूर जिल्हातून मातंग समाज संघ महाराष्ट्र राज्य संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिनाक्षीताई पेठे यांनी केले तर आभार आदर्श भैय्या धडे यांनी मानले.

शिक्षित समाज,सदृढ समाज
मातंग समाज संघ महा.राज्य