मातंग समाज संघ महा.राज्य शेंद्रा मांगवीरबाबा यात्रा
छ. संभाजी नगर जिल्हा यांच्या वतीने दिनांक १८ एप्रिल २०२५ रोजी शेंद्रा मांगवीर बाबा यात्रा निमित्त शिक्षण ,रोजगार ,व्यवसाय ,प्रबोधन आणि मार्गदर्शन या पंच सुत्रीचा अवलंब करून शिक्षणाचा जागर उपक्रम राबविण्यात आला . या उपक्रमात अनेक विद्यार्थी आणि पालक यांनी भाग घेतला ,उपस्थित पालक आणि विद्यार्थी यांना तंत्र शिक्षण ,आय टी आय बाबत माहिती पत्रक निशुल्क वाटण्यात आली . प्रसंगी ऍड विक्रम गायकवाड सर, संस्थापक अध्यक्ष ,श्री भाऊसाहेब साठे सर राज्य उपाध्यक्ष , श्री अनिल दाभाडे साहेब कार्यवाहक छ संभाजी नगर , ,श्री अशोक नाडे साहेब जिल्हा अध्यक्ष , श्री रामदास साठे साहेब जिल्हा समन्व्यक आणि पदाधिकारी उपस्थित होते
दिनांक 17 एप्रिल 2025 रोजी वरखेड ता नेवासा जिल्हा अहिल्यानगर येथे लक्ष्मी देवी यात्रा निमित्त शिक्षणाचा जागर हा उपक्रम राबविण्यात आला.
प्रसंगी ॲड.विक्रम गायकवाड संस्थापक अध्यक्ष, कार्याध्यक्ष श्री संजय भोंडवे सर, श्री राजू पवार सर मग.राज्य सरचिटणीस , श्री भाऊसाहेब साठे उपाध्यक्ष महा.राज्य, श्री सुरेश जगधने अहिल्यानगर कार्यवाहक, श्री कैलास उमप अहिल्यानगर समन्वयक , श्री लखन ससाणे पोतराज सेना, श्री कनगरे पोतराज सेना संघटना अध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment