आमच्या विषयी माहीती -लहु वंदना /संघ प्रार्थना


|| लहु वंदना ||


मनोभावे नित्य । लहूजीस वंदन
आम्हां स्फुर्ती देई  राघोजीचा नंदन,
श्वासात शौर्य , चाले त्यागाचे स्पंदन, 
अशी त्यांची किर्ती , फिके वाटे चंदन ||
सदृढ करी तनमन , बळकट बलवान, 
धाडस उरात , भरी धैर्यवान, 
अमौलिक शिकवी , हा राष्ट्राभिमान, भारत मातेसाठी , असे नरजन्म ॥
अमर ठरले शिष्य , ते उमाजी राजे, 
क्रांतीवीर फडके, टिळक नाव गाजे,
 ज्ञानाची ज्योत , जोति म्हणे गुरू माझे ,
जय लहुजी नारा , अखंड विराजे ,
जय लहुजी नारा । अखंड विराजे | 
जय लहुजी 

                                                                                          शाहीर बापू पवार 
                                                                                               [महाराष्ट्र]

*संघ प्रतिज्ञा*
*मी अशी  प्रतिज्ञा करितो की, माझे आद्य क्रांतीगुरू श्री लहुजी वस्ताद साळवे,प.पू. विश्र्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न डॉ.अण्णा भाऊ साठे. या महान विभूतींचे सदविचार माझ्या जिवनात कर्म रूपाने उतरवून,त्या विचारांवर चालण्याचा मी सदैव प्रयत्न करीन.*
*मी मला जन्म दिलेल्या आई वडीलांना साक्ष ठेवून शपथ घेतो की,मी माझ्या मुलांना भरपूर प्रयत्न करून चांगले उच्च शिक्षण देईन. समाज घडविण्या कामी मी राजकीय पक्ष बाजूला ठेऊन जातीसाठी, समाज बांधवांसाठी,एकत्रीत येऊन समाज संघटीत करून,माझ्या तरूण वर्गाला रोजगार मिळण्यासाठी प्रोत्साहन देईन.*
*कष्टाशिवाय यश नाही हे त्रिकाल सत्य आहे.त्या करिता प्रबोधन आणि मार्गदर्शन सुद्धा करेन.म्हणजेच यापुढे शिक्षण,रोजगार,व्यवसाय प्रबोधन,आणि मार्गदर्शन या पंच सुत्रीचा अवलंब करीन* 
*प्रथम कुटूंब सुधारल पाहीजे,* *त्याबरोबरच माझा समाज सुधारला पाहीजे हे माझे ध्येयअसेल.शैक्षणिक कार्याचा लढा  यशस्वी  करण्या करिता निस्वार्थपणे कार्य करेन अशी मी मनःपूर्वक प्रतिज्ञा करतो.*
"मातंग समाज संघ परिवार!
एक परिवार! नेक परिवार"


*जय लहुजी! जय भीम ! जय अण्णाभाऊ साठे!!जय भारत !!!*

आमच्या  विषयी  माहीती 

मातंग समाज  संघ या संघटनेची  स्थापना  मा .श्री . विक्रम जी गायकवाड़ साहेब यांनी मुलुंड मुंबई येथे केली . मातंग  समाज  संघ ही संघटना मातंग समाजाला सामजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक  आणि आर्थिक दृष्टया संघटित करणारी आहे. शिक्षण, रोजगार , मार्गदर्शन हे संघटनेचे ब्रीदवाक्य असून त्याना  अनुसरण आम्ही कार्य करतो आज देशाला स्वतंत्र मिळुन  75  वर्ष झाले  तरीही  मातंग समाजाची सामाजिक व आर्थिक प्रगति व्हायला पाहिजे ती झाली नाही।
 शिक्षण म्हणजे समजणं, शिक्षण म्हणजे स्वत: विचार करणं, शिक्षण म्हणजे समाजासाठी जीव तुटणं, शिक्षण म्हणजे कष्ट करू शकणं, शिक्षण म्हणजे चांगलं माणूस होणं, शिक्षण म्हणजे संकुचितपणा नष्ट होणं.. 
        महाराष्ट्रतील मातंग समाज - एका  सर्वेक्षणा  नुसार माहिती पुढे आली आहे ती  म्हणजे
. २०% मुले  शाळेच्या पटावार नाहीत.
२. ६० % मुले चौथी  इयत्ते  अगोदर शाला   सोडतात. 
३. १५ %  मु  ले दहावी पर्यन्त शिकतात. 
४. ०५ % मुले फक्त पदवी पर्यन्त शिकतात. 

वरील आकडेवारी वरुन आपल्या लक्षात  येइल मातंग समाजाची शैक्षणिक स्थिति कशी  आहे. 
         मातंग समाजाची शैक्षणिक प्रगति व्हावी याकरिता शैक्षणिक क्षेत्रात  आमची संघटना भरीव कार्य  करते.
         मातंग समाजाला स्वत:ची प्राचीन परंपरा व इतिहास आहे. मातंग समाजाची स्वत:ची अस्मिता आहे.
या समाजाचे स्वत:चे कांही प्रश्न आहेत आणि ते मातंग समाजच सोडवू शकतो. मातंग समाजाने आपले 

मित्र कोण आहेत आणि शत्रू कोण आहेत हे ओळखले पाहिजे, उगीच इतरांच्या मागे भरकटत गेल्यास त्यात

आपलेच नुकसान आहे. मातंग तरुणांनी एकत्र येण्यासाठी या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. 

सामाजिक विघटन आणि संघटन

( सोशल डिस्ऑर्गनाइझेशन अ‍ॅण्ड ऑर्गनाइझेशन)

. सामाजिक संघटन समाजातील सरलता टिकवून ठेवीत असले,तरी नेहमी तसेच चालू राहते असे नाही. प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीहून भिन्न असते. तिच्या आवडी-निवडी भिन्न असतात; सार्वजनिक नियमांचे पालन करण्याची वृत्ती भिन्न असते. यामुळे मतभेद होऊन संघर्ष उद्‌भवतो आणि फाटाफूट वाढत जाते. माणसे परस्परविरोधी वर्तन करतात. त्यामुळे हितसंबंध बिघडतात. हेवेदावे, भांडणे,कटकारस्थाने सुरू होतात. संघटन मोडते, ऐक्याला धोका होतो आणि समाजात अशांतता निर्माण होते. मतभेद ताणले जाऊन समूहांमध्ये भेदनीय परिस्थिती निर्माण होते, त्याला सामाजिक विघटन म्हणतात.

सामाजिक विघटनामुळे समाजाचे नुकसान होते. संघर्षात हिंसा, आक्र मण, क्रू रता अशा समाज विघातक कृती व वर्तनांचा अवलंब केला जातो. कुटुंब, नातेवाईक, शेजारी, गाव या साऱ्या समूहांचे अतोनात नुकसान होते.

विघटनाची सुरु वात स्पर्धेने होते. स्पर्धा ही साधनसामगी कमी आणि मागणी जास्त यांमुळे होते. स्पर्धा आणि चढाओढ विकासाला पोषक असू शकतात; मात्र त्यांत खेळमेळीचे व निकोप विचारांचे संयमित धोरण असावे लागते. गैरमार्गांचा अवलंब झाला आणि स्पर्धात्मक वर्तनांच्या मर्यादा ओलांडून स्वार्थ बोकाळला, तर विघटन होते. अपयशी, निराश, वैफल्यगस्त समूह एकत्रित होऊन एखादे दुष्कृत्य घडवून आणतात. त्यामुळे सामाजिक विघटन गंभीर स्वरूप धारण करते. सामाजिक विघटनाचे सर्वांत उग स्वरूप दहशतवादी व आतंकवादी कारवायांद्वारे चालू असलेल्या घटनांमध्ये दृग्गोचर होते. शिवाय विविध देशांमधील युद्घसंबंध, शस्त्रास्त्रस्पर्धा, सीमावाद आदींमधून सामाजिक विघटनाची प्रक्रिया घडते.

परस्परांतील स्पर्धा इतकीच ताणावी की, ज्यामुळे विघटनास सुरु वात होणार नाही; अहिंसेचे स्वरूप दगडफेक आणि जाळपोळीत होणार नाही. यासाठी समाजातील कायदा-सुरक्षा व्यवस्थेची काटेकोरपणे अंमलबजावणी करणारे शासन,पोलीस आणि जनता व समाजसेवी संस्था यांच्यामध्ये समन्वय असावा. समूहांमधील असहकाराचे वेळीच नियमन झाले नाही;तर दुसऱ्यांच्या हक्कांवर गदा आणण्याचे कृत्य घडते आणि विघटनास सुरुवात होते. निकोप, सुयोग्य आणि परस्परपूरक संघटन समाज, देश, राष्ट्र घडविते आणि विसंघटन रोखून विनाश थोपवते. अनेक संघटनांचे जाळे म्हणजेच समाज, हे तत्त्व आचरणात आणले, तर विघटनास आळा बसेल.

समाज आणि व्यक्ती यांचे परस्परसंबंध विविध प्रकारचे असतात; मात्र दोघांचा समाजात राहण्याचा उद्देश एक असतो,निसर्गातील ऊर्जाशक्तीशिवाय व्यवहार चालूच शकत नाहीत. त्यामुळे व्यक्ती आणि व्यक्तीचे समूह समाजात बहुतेक वेळी एकमेकांशी जुळवून घेऊनच आपापले व्यवहार करीत असतात. सहकार, सहकार्य, सहभाग इत्यादींमुळे व्यक्तिव्यक्तींमधील संघटन टिकून राहते.

समाजातील निरनिराळ्या गटांमध्ये विशिष्ट उद्दिष्ट साधण्याच्या हेतूने आणि परस्परसंबंध प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने विविधक्रिया, प्रतिक्रिया, आंतरक्रिया घडत असतात. त्या नियंत्रित करण्यासाठी, त्यांची कामे किमान काही शिस्तीने व्हावीत,यांसाठी संघटनांची निर्मिती होते आणि समान हितसंबंधांमुळे आणि सामुदायिक प्रयत्नांतून त्या संघटना कार्यरत राहतात. संघटन म्हणजे विविध गुणधर्मांचे, विविध धर्मांची उपासना करणारे आणि विविध व्यवसाय करणारे लोक समान उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी एकमेकांना आवडेल अशीच जीवनपद्घती स्वीकारतात. त्यासाठी ते आपसांतील भेद आणि भिन्न आचार-विचार तात्पुरते विसरतात किंवा बाजूला ठेवतात. एका प्रकारे संघटन करताना त्याग करावा लागतो. संघटित समूह आणि सहजासहजी एकत्र झालेले लोक यांत फरक असतो. रस्त्यावरची गर्दी, सभेचा श्रोतृवृंद, चित्रपट वा सर्कशीचा प्रेक्षकवर्ग यांना ‘संघटन’ म्हणता येणार नाही. ही मंडळी, कोण्या एकाच्या बोलविण्यावरु न तिथे आलेली नसतात, ती प्रसंगोपात्त व काही निमित्ताने एकत्रित आलेली असतात, ती परस्परांना अपरिचित असतात व त्यांना परस्परांच्या सहकार्याची गरज असतेच असे नाही.

संघटन म्हणजे समाजातील माणसांचा समूह बनविणे. सामाजिक जीवन सुरळित चालविण्यामागे दोन मूलभूत तत्त्वे दडलेली आहेत. संघटनात्मक जीवन जगणे, हे त्यातील प्रमुख तत्त्व होय. तसेच परस्परसंबंधांची आणि विचारांची देवाणघेवाण हे दुसरे तत्त्व होय. त्यातूनच सामाजिक संघटना विकसित होत जातात. संघटनांचे उद्दिष्ट, दिशा आणि मार्ग यांनी निश्चित केलेले असते. यांत सभासदांनी सहकार्य करण्याचे तत्त्व स्वेच्छेने स्वीकारलेले असते. त्यांच्यातील समन्वय संघटनेला पूरक ठरतो. एरवी सक्ती करून समन्वय साधण्याचा प्रयत्न केल्यास संघटना यशस्वी होईलच याची खात्री नसते; कारण अशा सक्तीने स्वयंप्रेरणा होत नाहीत. म्हणून समाजरचनेतील संघटनांचा विकास पूर्ण नियोजित असला तरच पुढचे कार्य सुलभ होते.

सहकार्य प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असे दोन प्रकारचे असते. जेथे व्यक्ती सहकार्य निःस्वार्थीपणे करीत रहाते, तेथे सहकार्य प्राथमिक स्वरूपाचे रहाते. मानवशास्त्रज्ञांच्या मते नातेसंबंध हे अनौपचारिक संघटनेचे उदाहरण होय; तर हेतूपूर्वक स्थापन झालेल्या (कामगार संघटना, राजकीय संघटना ) संघटना या औपचारिक स्वरूपाच्या असतात. अनौपचारिक संघटनांमध्ये श्रम-विभाजनास महत्त्व असून ठरवून दिलेली जबाबदारी प्रत्येकजण पार पाडतो आणि अशा सहभागातून मोठी योजनाही सहजपणे पार पडते. उदा., मोठमोठी संमेलने, चळवळी, कांतीसारख्या अजरामर कृती.

संघटनेसाठी कुशल नेतृत्वाची गरज असते. निष्ठा निर्माण करु शकणारे नेते आणि निष्ठावान कार्यकर्त्यांचा सहभाग यांमुळे संघटित प्रयत्न यशस्वी होतात. नेतृत्वाइतकीच महत्त्वाची गरज असते, ती कार्यक्षम व्यवस्थापनाची. संघटन मोठ्या अथवा लहान प्रमाणावर असो, काळ अल्प किंवा दीर्घ असो, कार्यक्रम आखताना शेवटपर्यंत सहकार्य कसे टिकून राहील, यासाठी व्यूहरचना करावी लागते. आधुनिक काळात केवळ त्याग, निष्ठा आणि सेवा यांच्यामुळे संघटन टिकाव धरू शकत नाही. त्यासाठी विविध गुण असणारी सक्षम माणसे एकत्र यावी लागतात. जबाबदारी स्वीकारणाऱ्यांनी ती पार पाडली नाही, तर नियोजन कागदावरच रहाते.

संघटनासाठी सामाजिक संलग्नता आणि संमीलन पूरक ठरतात, त्यामुळे उद्देश आणि मनोवृत्ती सारख्या बनतात आणि परस्परसंवाद चालू राहतात; संघटितपणा टिकून राहतो. संमीलन हळूहळू घडणारी प्रक्रिया असते. दोन भिन्न संस्कृती असणाऱ्या गटांना एकत्र राहताना सुरुवातीच्या पिढीला एकमेकांशी जुळवून घेणे अवघड जाते; मात्र मुले मोठी होत जातात,तसतशी ती इतर समूहाची संस्कृती आत्मसात करतात आणि संमीलन होत जाते. एखादा गट (जुना किंवा बाहेरून आलेला नवा) बलवान आणि प्रभावी होतो, तर दुसऱ्यांना त्याचे आकर्षण वाटून ते आपले जुने काही सोडून नव्याचा स्वीकार करतात. बलवान गट हा संदर्भ-गट बनतो आणि मार्गदर्शकही. आज भारतीय संस्कृती विविधांगी असली, तरी एका राष्ट्राचे सदस्य म्हणून एक झेंडा, एक राष्ट्रगीत, एक राज्यघटना मानून एकता टिकवून ठेवू शकते. संघराज्य म्हणून तो भारताचा संघटित समूह आहे.

संघटन समाजव्यवस्थेला, समाज विकासाला उपकारक असते. उदा., राजकीय संघटना, कामगार संघटना, विद्यार्थी व शिक्षक संघटना इत्यादी. त्या अन्याय झाल्यास वाचा फोडतात. धार्मिक क्षेत्रातही मंदिरे, उत्सव आणि सामुदायिक प्रार्थना इ. मार्गांनी लोक संघटित होतात आणि त्या क्षेत्राचे अधःपतन रोखले जाते. समाजनिर्मिती, समाजसंगोपन आणि समाज-प्रवृती या सर्वांसाठी एका समान सूत्रानुसार संघटना निर्माण होतात आणि वाढतात. ती गरज संपली की, संघटना विघटित होतात आणि त्यांच्या जागी नव्या संघटना उदयास येऊन त्या काळाची व परिस्थितीची गरज भागवितात. सामाजिक संघटन-सहकार्य-समन्वय आणि परस्परावलंबन हे सर्व मानवी व्यवहार आहेत आणि त्यामुळेच मानवी समाज संघटित राहून विकसनशील रहातो.


 

श्री . विक्रम गायकवाड़
संस्थापक -अध्यक्ष 
9820242442 

No comments:

Post a Comment