सर्व बंधू आणि भगिनी यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
दिनांक 20 ऑक्टोबर 2025 ते 20 नोव्हेंबर 2025 ह्या महिन्यात आद्य क्रांतीवीर लहुजी साळवे यांची जयंती उत्सव साजरा होणार आहे. या कालावधीत दीपावली पासून प्रत्येक समाजाच्या घरी संपर्क अभियान राबविण्यात येत आहे. ही सर्व समाज बांधवांची जबाबदारी आहे.
लवकरच भारतीय जनगणना नोव्हेंबर महिन्यात सुरू होणार आहे या उद्देशाने समाजाला योग्य दिशेने घेऊन जाण्यासाठी प्रत्येकाने स्वयं स्पूर्तीने सहभागी व्हावे.
1)जनगणना करताना आपली जात (मांग/मातंग) ,धर्म(हिंदू), शिक्षण ,वास्तव्य , या बाबत माहिती वाचून नंतरच फॉर्म वर सही करावी.
2)आरक्षण वर्गीकरण बाबत जनजागृती करावी.
3)शिक्षण, रोजगार, व्यवसाय, प्रबोधन आणि मार्गदर्शन या बाबत सखोल चर्चा करावी.
4)घरातील कुटुंबाची आस्थेने चौकशी करून त्यांच्या अडचणी समजून घेणे.
5) आर्टीच्या वतीने राबविण्यात येणारे उपक्रमाबाबत चर्चा करावी.
6)सरकारी कामासाठी लागणाऱ्या कागद पत्रा बाबत चर्चा करावी. विशेषतः जात प्रमाण पत्र कसे मिळवावे या बाबत चर्चा करावी.
7)गावातील उद्भवणाऱ्या समस्या बाबत चर्चा करावी. उदा. स्मशान भूमी प्रश्न.
8)शिक्षणाचे प्रमाण वाढविण्यासाठी जी मुले शाळेत जात नाहीत त्यांना शाळेकडे वळविण्यासाठी मार्गदर्शन करणे.
9) जी बेरोजगार मुली मुले बेरोजगार आहेत त्यांना व्यवसायाभिमुख प्रशिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करणे. उदा. तंत्र शिक्षण, कौशल्य प्रशिक्षण.
10)18 वी,12वी ,पदवीधर,विशेष प्राविण्य मिळविलेल्या मुलांची माहिती संग्रहित करणे.
लिंक वर क्लिक करून माहिती भरावी.
11) व्यसन मुक्ती साठी आग्रह धरणे सकारात्मक चर्चा घडून आणावी..
आपले जीवन प्रकाशमान होण्यासाठी दुसऱ्याच्या जीवनात अंधार पडला असेल तर तो दूर करण्यासाठी निःस्वार्थ पने कार्य करा तरच या संपर्क अभियानचे फलित होईल.
धन्यवाद.
जय लहुजी.
ॲड. विक्रम गायकवाड
9820242442

