शिक्षण हा परिवर्तनाचा एकच उपाय आहे.
आपल्या मुलांना शाळा शिकवा.
स्मशानभूमी लढा
(15 ऑगस्ट 2025 रोजी ग्राम सभेत हा विषय प्रत्येक गावाने
लिखित स्वरूपात देण्यात यावा.)*
दिनांक 15 /8/25 ग्रामसभा
प्रति,
सरपंच साहेब
ग्रामसेवक साहेब,
ग्रामपंचायत कार्यालय
पूर्ण पत्ता........
गाव...........
ता...........
जिल्हा............
विषय - मातंग समाज स्मशान भूमी आरक्षित करून प्राथमिक सुविधा पुरविण्याबाबत.
महोदय,
वरील विषयी आम्ही गावातील रहिवाशी आज दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी आयोजित ग्राम सभेत प्रस्ताव सादर करीत आहोत की मातंग समाजा साठी असलेल्या स्मशान भूमीत अत्यावश्यक सेवा पुरविण्यात याव्यात.
तसेच सार्वजनिक स्मशान भूमी आरक्षित करून द्यावी.
तसेच अतिक्रमण रोखण्यासाठी स्वतंत्र कुंपण घालून देण्यात यावे.
आपले विश्वासू,
समस्त
मातंग समाज बंधू भगिनी
सही
1
2
3
4
5
प्रत
पंचायत समिती कार्यालय.
जिल्हा परिषद अधिकारी
तहसीलदार
जिल्हा अधिकारी
मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
महसूलमंत्री महाराष्ट्र राज्य
समाजकल्याण मंत्री महाराष्ट्र
टीप - सदर पत्र ग्रामपंचायत कार्यालयास देऊन त्याची पोच घ्यावी.
तसेच पोच अर्जाची सत्यप्रत
संबंधित कार्यालयास पोस्टाने (रजिस्टर AD करून ) पुरावा जवळ ठेवावा
जय लहुजी
आपण रिक्षा चालक / मालक आहात का ?
तर धर्मवीर आनंद दिघे ऑटो कल्याणकारी मंडळ योजनेचा फायदा घ्या.
खालील लिंक वर जाऊन माहिती भरा
आणि विविध योजनाचा फायदा घ्या. https://ananddighekalyankarimandal.org/home/register
धन्यवाद.
शिक्षित समाज सदृढ समाज
मातंग समाज संघ महा.राज्य
शिक्षित समाज सदृढ समाज घडवण्यासाठी शिक्षणाचा जागर हा उपक्रम सुरू करत आहोत.
मातंग समाज संघ महा.राज्य
घराघरात साहित्य रत्न लोकशाहीर डॉ अण्णा भाऊ साठे हे घरोघरी पोचले पाहिजेत या साठी साहित्य रत्न लोकशाहीर डॉ अण्णा भाऊ साठे यांनी लिहलेला प्रसिद्ध महाराष्ट्र पोवाडा सचित्र ए आय चित्रफीत
जय लहुजी
आद्य क्रांतिवीर लहुजी साळवे यांची वंदना मुळे देशाभिमान आणि चैतन्य निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही
शाहीर बापू पवार यांनी लिहलेले आणि आपल्या मधुर आवाजात हे वंदन गीत घराघरात पोहचले पाहीजे

🇨🇮 अहिल्या नगर ता राहता नीमगांव जाळी येथील सुपुत्र यशवंत पवार सूभेदार स्थल सैन्यातुन २८ वर्ष सेवा हि कारगिल ते राजस्थान बॉर्डर पर्यंत सेवा करुन ,सेवानिवृत्त झाले होते.
आज दिनांक 6 जुलै 2025 रोजी मुंबई मध्ये मातंग समाज संघ महा.राज्य मुख्य कार्यालयात त्यांचा आदरणीय ॲड.विक्रम गायकवाड सर आणि त्यांच्या सौ.लता ताई गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सोबत श्री शंकर सोळसे साहेब उद्योजक यांचाही सत्कार करण्यात आला.
प्रसंगी मातंग समाज संघात सक्रिय सहभाग होणार असल्याचे नमूद केले आहे.
सन्माननीय सुभेदार यशवंत पवार सर यांचे खूप धन्यवाद आणि आभार